गायरान जमीन म्हणजे काय ? तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 अन्वये, गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी (forest), राखीव जळणासाठी (For reserve burning), गावातील गुराढोरांकरिता मोफत कुरणासाठी (For free grazing for cattle), राखीव गवतासाठी (For reserve grass), वैरणीसाठी for hatred, दहनभूमीसाठी (For crematorium) किंवा दफनभूमीसाठी (burial ground), गावठाणासाठी, छावणीसाठी (Camp), मळणीसाठी (threshing), बाजारासाठी (market), कातडी कमवण्यासाठी (Tanning Process’ of Animals Skin), रस्ते (Road), बोळ, उद्याने (Gardens), गटारे (sewers), यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळे ठेवल्या जातात. अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी (pasture) राखीव Reserve ठेवण्यात आलेल्या जमिनी या ‘गायरान जमीन’ आहेत. म्हणजेच आपल्या गावाच्या अवतीभोवती असलेल्या सार्वजनिक वापराकरिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली जमीन म्हणजेच गायरान जमीन. या जमिनीचा ताबा (possession) हा ग्रामपंचायतीकडे असला तरी देखील याची मालकी ही शासनाची असते.
Adv. Sarika Khude's Blog
We Make Law Easy For Everyone